सिंधुदुर्ग : शिवसेनेची ऑफर होती, मात्र मी ती नाकारली, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Continues below advertisement
आपल्याला शिवसेनेचीही ऑफर होती, मात्र आपण ती नाकारल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला. ते आज सिंधुदुर्गात एबीपी माझाशी बोलत होते. आपल्यासाठी सर्व पक्षात जागा असल्याचंही राणे म्हणाले. मात्र माझी पुढची दिशा काय असेल हे पाहण्यासाठी तुम्हाला 21 तारखेची म्हणजे घटस्थापनेच्या दिवसाची वाट पाहावी लागेल असं राणेंनी म्हटलं. तसंच आपल्या मुलांबद्दल जाणूनबुजून अफवा पसरवल्या जातात असंही राणे म्हणाले. मात्र राणेंच्या या सगळ्या दाव्यांवर त्यांच्या सिंधुदुर्गातील विरोधकांनी तोंडसुख घेतलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram