सिंधुदुर्ग : आंबोली इतकाच निसर्गरम्य असणारा मांगेली धबधबा

Continues below advertisement
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेला मांगेलीचा धबधबा धो-धो कोसळतो आहे. आंबोली इतकाच निसर्गरम्य असलेला सिंधुदुर्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकमधील पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत. गर्द वनराईतील हा धबधबा दोडामार्गाहून ३० कि. मी. वर आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram