सिंधुदुर्ग : लोकपरंपरेचं दर्शन घडवणारा तेर्सेबांबर्डे गावातील शिमगोत्सव

Continues below advertisement
ढोल-ताशांचा नाद, पारंपारिक नृत्य आणि विविध सोंगाच्या वेशभूषा यातून तळकोकणातल्या शिमगोत्सवाचे रंग पाहायला मिळतात. लोकपरंपरेचे दर्शन घडवणारा हा शिमगोत्सव कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावात नुकताच पार पडला. यावेळी महिलांनी मोठ्या उत्साहात ढालोत्सव साजरा केला. शिमगोत्सवात महिलांचा तसा सहभाह नसतो, मात्र तेर्सेबांबर्डे गावाच्या श्री कुलदेवता मंदिराच्या पटांगणावर पारंपरिक पध्दतीने स्त्री शक्तीचा जागर म्हणजेच ढालोत्सव साजरा केला जातो. ढालोत्सवातल्या गाण्यांचे कुठेही लिखाण नसतानाही ही गाणी न विसरता महिला चालबद्धरित्या गातात. त्यामुळे तळकोकणातल्या या ढालोत्सवामुळे शिमगोत्सवाला अनोखा साज चढतो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram