सिंधुदुर्ग : पावसाची दमदार हजेरी, अनेकांच्या घरात ओढ्याचं पाणी

Continues below advertisement
सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस झाला आहे. रस्ते जलमय झाले असून अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. वीज खांबांवर झाडं पडल्यानं काही मार्गावरील वाहतूक तसेच वीजपुरवठा खंडित झाला आहे.  देवगड तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक अशी १ हजार २५९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खवणे गावात काल सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने गावातील ओढा अक्षरशा तुडुंब वाहू लागला. या ओढ्यातील पाणी घरात शिरल्याने अनेक घरांचे आणि घरातील सामानांचे नुकसान झालं. तर एका व्यक्तीची गाडीही या ओढ्याच्या प्रलयात वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान काही वेळाने पाऊस ओसरल्यानंतर या ओढ्याचं पाणी कमी झालं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram