सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर मराठा मोर्चाचं आंदोलन
सिंधुदुर्गातही आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. कुडाळ तालुक्यातील बिबवणे गावात मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलकांनी टायर जाळून चक्का जाम आंदोलन केलं. यावेळी महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सुमारे अर्धा तास आंदोलकांनी महामार्ग रोखून धरला. रात्री १२ वाजता हे आंदोलन सुरु करण्यात आलं होतं. त्यामुळे तळकोकणातही मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला पाहायला मिळतोय.