सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील सुंदर बीच म्हणून भोगवे समुद्रकिनाऱ्याची निवड
जगभरातील सर्वोत्कृष्ट बीचसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या ऑस्कर दर्जाच्या ब्लू फॉग मानांकनासाठी भारतातर्फे आठ सुंदर बीचची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव सुंदर बीच म्हणून सिंधुदुर्गातल्या भोगवे बीचची निवड करण्यात आली आहे. समुद्राच्या पाण्याचा दर्जा, किनाऱ्यावरची स्वच्छता, कनेक्टीव्हीटी, पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरण व्यवस्थापन या सगळ्या निकषांच्या आधारे ही भोगवे बीचची निवड करण्यात आली.