सिकंदराबाद : ट्रेनमध्ये चहा करण्यासाठी टॉयलेटमधील पाण्याचा वापर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एकीकडे सरकार बुलेट ट्रेनची तयारी करत असताना दुसरीकडे रेल्वेचा गचाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेनमधील एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ट्रेनमधील कर्मचारी तेथील शौचालयामधील पाण्याने चहा बनवत असल्याचं दिसत आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ खरा आहे की, नाही याबाबत बरीच चर्चा सुरु होती. पण आता रेल्वेकडूनच याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खरा असल्याचं समोर आलं आहे. रेल्वे याप्रकरणी वेंडरला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.