श्रीनगर: ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येमागे आयएसआयचा हात

जम्मू काश्मीरमधले ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्य़ेप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे, तर अजून तिघे अद्यापही फरार आहेत... बुखारी हे रायझिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक होते. लष्कर ए तोयबा-हिजमुल या दहशतवादी संघटनेच्या दोघांनी बुखारी यांची हत्या केल्याची माहिती आईबी आणि जम्मू काश्मीर पोलिसांना मिळाली आहे.... आणि या हत्येमागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याची दाट शंका आहे. परवा कार्यालयातून परतत असताना श्रीनगरमधील प्रेस कॉलनी परिसरात बुखारी यांच्यावर हल्ला झाला होता.. त्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola