नवी दिल्ली : रेल्वेकडून 'श्री रामायण एक्स्प्रेस'ची घोषणा, कसा असेल मार्ग?
Continues below advertisement
निवडणुकांच्या तोंडावर भाजप पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा देण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयानं जनतेला रामायण काळात घेऊन जाण्यासाठी नवीन टुरिस्ट ट्रेन 'श्री रामायण एक्स्प्रेस' सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रामायणाचे संदर्भ असणाऱ्या ठिकाणांची सफर ही ट्रेन घडवणार आहे. रामायणातील महत्वाच्या स्थळांना जोडणारी १६ दिवसांची ही यात्रा असणार आहे. दिल्लीहून 14 नोव्हेंबरला ही रेल्वे सेवा सुरु होणार आहे. त्यावेळी मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या निवडणुका ऐन भरात असतील, 2019चे बिगुल वाजायला सुरुवात झाली असेल, त्याचवेळी ही ट्रेन सुरु होणार आहे. त्यामुळे निवडणूक जवळ आल्यानं राम नामाचा गजर सुरु झाला आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Continues below advertisement