भिडे गुरुजी आजचे ‘बाजीप्रभू’, आम्ही त्यांच्यासोबत : शिवसेना
माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं अजब दावा करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून तुफान स्तुतीसुमनं उधळली आहेत. केवळ वरवरची स्तुती नव्हे, तर शिवसेनेने संभाजी भिडेंची तुलना थेट बाजीप्रभू देशपांडे यांच्याशी केली आहे. संभाजी भिडे म्हणजे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे आहेत, असे ‘सामना’त म्हटले आहे.