Chai Pe Charcha | भाजप-शिवसेना आमदारांची आज चाय पे चर्चा | मुंबई | ABP Majha
शिवसेना भाजप युतीमध्ये अंतर्विरोध ठाई ठाई दिसून येतो. कधी कोण काय बोलेल याचा काही नेम नाही, समन्वयाचा अभाव तर ठरलेला, असं असुनही लोकसभेत यश मिळालं पण विधानसभेला सामोरं जाताना विनाकारणचे वाद टाळायचं दोन्ही पक्ष ठरवतायात असं चित्र दिसतंय. युतीच्या आमदारांची चाय पे चर्चा रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत.