VIDEO | शिवस्मारक समितीची आज मुंबईमध्ये बैठक | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

Continues below advertisement

सार्वजनिक बांधकाम विभागानं शिवस्मारक प्रकल्पाच्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे लेखी आदेश दिले आहेत. पर्यावरणवाद्यांच्या याचिकेचा राज्य सरकारला मोठा फटका बसला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं त्याबाबतची कार्यवाहीसुद्धा सुरु केली आहे. त्यामुळं शिवस्मारक प्रकल्पाचं काम आणखी रखडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं स्थगितीचे तोंडी आदेश दिल्याचं सरकारी वकिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवल्यानंतर ही कार्यवाही सुरु झाली आहे. याबाबत आज शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram