Shahapur Vidhan Sabha | शहापूरमध्ये बरोरा विरुद्ध दरोडा सामना रंगणार | ABP Majha
शहापूरचे शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी अखेर आज राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी काही दिवसांपूर्वीच हातावर शिवबंधन बाधलं. बरोरा यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळणार असल्याने दौलत दरोडा नाराज होते. त्यामुळे त्यांनीही शिवबंधन सोडत हातावर घड्याळ बांधलं. त्यामुळे शहापूरमध्ये शिवसेनेचे पांडुरंग वरोरा विरुद्ध राष्ट्रवादीचे दौलत दरोडा असा सामना रंगणार आहे. दरम्यान, सुरूवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार... काट्यानं काटा काढणार.. असं म्हणत अजित पवारांनी महायुतीला आव्हान दिलंय. तसेच वरळीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.