शिर्डी : नववर्षानिमित्त साईंच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी
Continues below advertisement
शिर्डीच्या साई मंदिरात नववर्षाच्या स्वागतासाठी भक्तांची गर्दी झाली. नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटन स्थळांप्रमाणेच धार्मिक स्थळांवरही भक्तांची मांदियाळी झाली.साईंचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये देशभरातून भाविक दाखल झाले. तर नव्या वर्षाच्या मुहूर्तावर साई मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर तिकडे पंढरपुरात विठुमाऊलीच्या दर्शनसाठी मोठी गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर भरणा बघायला मिळतो आहे.
Continues below advertisement