शिर्डी : ग्रहण काळात शिर्डीचं मंदिर 4 तास बंद राहणार
Continues below advertisement
आजच्या खग्रास चंद्रग्रहणामुळे शिर्डीचं साईबाबा मंदीर 4 तास बंद राहणार आहे..संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय साई मंदिर प्रशासनानं घेतला आहे...याकाळात होणारी साईबाबांची धूप आरतीही रद्द करण्यात आली आहे. चंद्रगहण संपल्यानंतर साईंचे मंगलस्नान होईल आणि त्यानंतर वस्त्र-अलंकार परिधान केले जातील. हा विधी पार पडल्यानंतर दर्शनरांग सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर शनी-शिंगणापूरच्या शनिलाही खग्रास चंद्रग्रहणाची धास्ती लागलीय... कारण आज दिवसभर शनि चौथऱ्याचं दर्शन बंद ठेवण्यात आलंय...तर शनीची आरतीही सायंकाळी साडे सहाऐवजी ग्रहण संपल्यानंतर नऊ वाजता करण्यात येणार आहे... तर इकडे टिटवाळ्यातल्या महागणपतीचं मंदिरही खग्रास चंद्रग्रहणामुळे भाविकांसाठी 4 तास बंद ठेवण्यात येणार आहे..
Continues below advertisement