शिर्डी : रामनवमीनिमित्त ढोल-ताशाच्या गजरात पालखी सोहळा, साईभक्तांची मोठी गर्दी
Continues below advertisement
शिर्डीतील रामनवमी मोठ्या दिमाखात साजरी होत असते. यंदाही शिर्डीत लाखोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली आहे. आज पहाटे साईबाबांच्या काकड आरतीने उत्सवाला सुरुवात झाली आणि साईबाबांच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसंच दरवर्षी प्रमाणे 53 दिवस आणि तब्बल चौदाशे किलोमीटरचा पायी प्रवास करत श्रीक्षेत्र काशीहून आलेल्या जलदिंडीचं सकाळी स्वागत करण्यात आलं. या जलाने साईंना जलाभिषेक घातला जातो. तर रामनवमीनिमित्त मुंबईतील जयंत या साईभक्तानं १३५१ ग्रॅम वजनाची सोन्याची पंचारती साईंच्या चरणी दान केली आहे. तर आज दिवसभरात साईंच्या चरणी ७१ लाख रुपयांचं सोनं भाविकांनी दान केलं आहे.
Continues below advertisement