शिर्डी : धावपट्टीवरुन विमान खाली उतरलं, प्रवासी सुखरुप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 May 2018 11:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिर्डी विमानतळावर मुंबई-शिर्डी विमान धावपट्टीवरून घसरून थेट मातीत रुतलं. सुदैवानं अपघात टळला असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. जेव्हा हे विमान लँड झालं तेव्हा मोठा आवाज झाला आणि मातीचा धुराडा उडाला. यामुळे प्रवाशांमध्येही काही काळ घबराटीचं वातावरण होतं. या घटनेनंतर सर्व प्रवाशांना हॉटेल्समध्ये हलवण्यात आलं. मात्र याआधीही शिर्डी विमानतळावर विमान बंद पडणं, आग लागणं अशा घटना घडल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.