शिर्डी : नारायण राणे भाजपात गेले तर त्यांना पश्चाताप होईल : जयंत पाटील
नारायण राणे जर भाजपात गेले तर त्यांना पश्चात्ताप होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलं. त्याचबरोबर आपण राष्ट्रवादीत गेलो असतो तर बरं झालं असतं राणेंना वाटेल असंही ते म्हणाले. नगरपालिका शाळेच्या डिजीटल क्लासरूमच्या उद्घाटनाच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमधील कार्यक्रमात ते बोलत होते.