शिर्डी : 2017-18 मध्ये साई संस्थानला 350 कोटींचं भरभरुन दान

Continues below advertisement
श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या झोळीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात दान जमा होतंय. 2017-18 आर्थिक वर्षात साईभक्तांनी साई संस्थानला तब्बल 350 कोटी रुपयांचे भरभरून दान दिलं. संस्थानच्या तिजोरीत 2016-17 मध्ये 210 कोटींचं दान जमा झालं होतं.  त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षापेक्षा यंदा तब्बल 140 कोटीचं अधिक दान प्राप्त झालय. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून शिर्डीच्या साईबाबांची गणना केली जात आहे. नोटबंदी केल्यानंतरही दानाच्या आकड्यात कोणतीही कमी झाली नाही. साई संस्थानला वस्तूंपासून ते सोन्यापर्यंत साईभक्त दान चढवतात. साई संस्थानच्या गंगाजळीचा आकडा आता २ हजार कोटींच्या वर गेला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram