शिर्डी : डोक्याला बाशिंग, हाती धनुष्य, भर मंडपात नवरीकडून आधी तिरंदाजीची प्रात्यक्षिकं, मग लग्न!
Continues below advertisement
स्वत:चं लग्न खास ठरावं, यासाठी अनेकजण काहीतरी खास करत असतात. श्रीरामपूर तालुक्यातील एका नवरीनेही अशीच एक खास गोष्ट केली. मात्र ही नवरी सामान्य नाही तर राज्यपातळीवरील तिरंदाज खेळाडू आहे. स्वामिनी उनवणे असं तिचं नाव. तिरंदाजीत राज्यपातळीवर चमक दाखवल्यानंतर, स्वामिनी आयुष्याची नवी इनिंग सुरु करत आहे. मात्र खेळाबद्दल ती विशेष जागरुक आहे. त्यामुळेच स्वामिनीने खेळाला आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग मानला आहे. त्याच हेतूने स्वामिनीने स्वत:च्या लग्नात, थेट तिरंदाजीची प्रात्यक्षिकं दाखवली, तिरंदाजीला मानवंदना दिली, त्यानंतरच ती बोहल्यावर चढली.
Continues below advertisement