शिर्डी : बहुप्रतीक्षित शिर्डी विमानतळाचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण, मुंबई-शिर्डी प्रवास 40 मिनिटांवर
Continues below advertisement
मुंबई ते शिर्डी हा प्रवास आता 40 मिनिटांत पार करता येणार आहे. कारण, बहुप्रतीक्षित शिर्डी विमानतळाचं आज लोकार्पण झालं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी 10 वाजता विमानतळाचं लोकार्पण झालं. त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता मुंबई-शिर्डी या विमानसेवेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
Continues below advertisement