शिमला : काळ्याभोर रात्री हातात मशाली घेऊन बर्फावर स्केटिंग
Continues below advertisement
शिमल्यात चक्क लख लख तेजाची न्यारी दुनिया बघायला मिळाली.. उत्तर भारतातलं थंड हवेचं ठिकाण सध्या बर्फाने वेढलं गेलंय.. आणि याच बर्फात रविवारी रात्री काही स्केटर्सनी हातात मशाली घेऊन स्केटिंग केलं... यावेळी शंभरहन अधिक पर्यटकांनीही हा सुंदर सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहिला.. पायाखाली पांढराशुभ्र बर्फ आणि हातात तेजस्वी मशाली असं हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवण्याजोगंच होतं.. खरंतर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अशा मशाल स्केटिंगचं आयोजन करतात. पण मागच्या 4-5 वर्षात तो योग जुळून आला नव्हता.. मात्र यंदा रात्रीच्या अंधारात मशालींच्या प्रकाशात हा लख लख चंदेरी तेजाचा सोहळा पर्यटकांना बघायला मिळाला.
Continues below advertisement