सोलापूर : रस्ता ओलांडताना ट्रकची धडक, पुणे-सोलापूर रोडवर एकाचा मृत्यू
सोलापुर-पुणे महामार्गावरच्या शेटफळजवळ रस्ता ओलांडताना ट्रकने धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यु झाला. शांतीनाथ कसबे असं मृत व्यक्तीच नाव आहे. सोलापुर-पुणे महामार्गावर सकाळी 7 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान वारंवार मागणी करुनही उड्डाणपुलाचं काम होत नसल्यानं हे अपघात होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या अपघातानंतर मृतदेह रस्त्यावर ठेऊन संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.