VIDEO | 2005 च्या भयानक पुरात कशी सावरली नरसोबाची वाडी? राशीभविष्यकार शरद उपाध्ये यांच्याशी बातचीत | ABP Majha

कोल्हापूर आणि सांगलीमधील कदाचित असा फार कमी भाग असेल ज्याला कृष्णेच्या आणि पंचगंगेच्या रौद्र रूपाला सामोरं जावं लागलं नसेल. सामान्यांचं आयुष्य तर या पुरात पूर्णपणे विस्कटून गेलं. आणि श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिरही या तडाख्यातून वाचू शकलं नाही. हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली नृसिंहवाडी अर्थात नरसोबाची वाडी पाण्याखाली गेली आहे.
तर आज आपल्यासोबत आहेत राशीभविष्यकार आणि दत्तभक्त शरद उपाध्ये. नृसिंहवाडीमध्ये त्यांचा आश्रमही आहे. सांगली-कोल्हापुरातील 2005 च्या भयानक पुराचे तेदेखील साक्षिदार होते. त्यावेळी पाण्यात गेलेल्या दत्त मंदिराला, नृसिंहवाडीला पुन्हा उभं राहताना शहर उपाध्ये हे साक्षीदार होते. आपली नाळ जिथे जोडलेली असते असं काहीसं पुराखाली गेल्यानंतरची अस्वस्थतेची आपण केवळ कल्पना करू शकतो. तर शरद उपाध्ये यांच्याशी आपल्याला विविध विषयांवर बातचित करायची आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola