VIDEO | मतांसाठी शरद पवारांनी पाकिस्तानच्या फायद्याचं बोलू नये : मुख्यमंत्री | ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केला आहे. "पवार साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या वक्तव्याचा फायदा आपल्या देशाला होतो की पाकिस्तानला होतो. मतांसाठी असं वक्तव्य करणं ही गोष्ट योग्य नाही," असं मुख्यमंत्री म्हणाले. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.