अहमदनगर : रेल्वेमंत्री पियुष गोयल सपत्नीक शनीदेवाच्या दर्शनाला
Continues below advertisement
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि त्यांच्या पत्नीने हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर शनिशिंगणापूरात शनी देवाचं दर्शन घेतलंय. यावेळी गोयल दाम्पत्यानं उदासी महाराजांच्या मठात शनीला तेलाचा अभिषेक घालून पुजा अर्चा केली. तसच पियुष गोयल यांनी चौथऱ्यावर जाऊन शनीचं दर्शन घेतलंय. यानंतर संस्थानच्या वतीने गोयल दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी निर्विघ्नपणे लातुरात रेल्वे कोचची निर्मीती व्हावी असं साकडही त्यांनी देवाला घातलं.
Continues below advertisement