G20 Summit | लोकसभेतल्या ऐतिहासिक विजयाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नरेंद्र मोदींचं अभिनंदन | ABP Majha

जी 20 शिखर परिषदेच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सकाळी साडेसहा वाजता (भारतीय वेळेनुसार) द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षण आणि 5 जी नेटवर्क या मुद्द्यांवर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल दाखवलेल्या जिव्हाळ्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले. त्याआधी जपान, अमेरिका आणि भारत या तीन देशांमध्ये त्रिपक्षीय चर्चा झाली. जपान अमेरिका आणि भारत या तीन देशांच्या इंग्रजी नावाच्या अद्याक्षराचा वापर करत या बैठकीला 'जय' हे नाव देण्यात आले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram