...म्हणून शाहरुख ममता बॅनर्जींच्या पाया पडला!
Continues below advertisement
अभिनेता शाहरुख खानने कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला उपस्थिती लावली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शाहरुखला आपल्या सॅन्ट्रो कारने एयरपोर्टपर्यंत सोडलं. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ गाजतो आहे. ममता बॅनर्जी यांनी एयरपोर्टला गाडी आल्यानंतर गाडीमधून उतरून शाहरुखसाठी गाडीचा दरवाजा उघडून दिला, तर शाहरूखनेही गाडीतून उतरून ममता यांचे आशीर्वाद घेतले.
Continues below advertisement