पुणे : ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं निधन
Continues below advertisement
जेष्ठ्य नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं आज निधन झालं. दीर्घ आजाराने पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हटकर यांनी प्रायोगिक नाटकांसह व्यावसायिक नाटकांचंही दिग्दर्शन केलं. राजाचा खेळ, उघडले स्वर्गाचे दार, मोरुची मावशी, कवडी चुंबक यांसह अनेक नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं. छबिलदास चळवळीसह विजया मेहता यांच्या नाटकांना नेपथ्य आणि प्रकाश योजनाही त्यांनी केली होती.
Continues below advertisement