मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या किमान बॅलन्स रकमेत मोठी घट
स्टेट बँक ऑफ इंडियानं किमान बॅलन्स ठेवण्याच्या नियमातून सरकारी कल्याणकारी योजनांचे लाभार्थी, अल्पवयीनांना पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी गटाला आता मिनिमम बॅलन्सची सक्ती नसेल. तसंच मेट्रो शहरांमध्ये बचत खात्यासाठी असलेली किमान बॅलन्सची मर्यादाही 5 हजारांवरून 3 हजारांवर केली आहे, तर ग्रामीण भागात 1 हजार रूपयांपर्यंत करण्यात आली आहे. याशिवया बॅलन्स नसलेल्या खात्यांवर लावल्या जाणाऱ्या दंडातही 20 ते 50 टक्क्य़ांपर्यंत कपात करण्यात आली आहे.