सातारा : सत्ता असो वा नसो, शेवटपर्यंत तुमच्यासाठी जगेन, वाढदिवसानिमित्त उदयनराजेंचा शब्द
Continues below advertisement
‘सत्ता असो वा नसो त्याला फार किंमत देत नाही. पण मात्र, जोपर्यंत ताकद आहे. तोवर तुमच्या सगळ्यांसाठी लढणार.’ असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थितांची मनं जिंकली. उदयनराजेंच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती.
Continues below advertisement