सातारा : अपघातानंतर झालेल्या मारहाणीत चालकाचा मृत्यू
पुणे-बंगरुळू महामार्गावर साताऱ्याजवळ एका ट्रॅव्हस्लने पाच जणांना चिरडल्याची घटना घडलीय. यात एका महिलेचा चिरडून मृत्यू झाला असून, अन्य ४ जण गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर तिथं असलेल्या नागरिकांनी ट्रॅव्हल्स चालकाला खाली खेचलं आणि त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत चालकाचाही मृत्यू झालाय. दरम्यान, पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, पुढील तपास करत आहेत.