सातारा : उदयनराजेंनी पहाटे आणेवाडी टोलनाका सोडला, 12 तासांनी वसुली सुरु
तब्बल 12 तासाच्या राड्यानंतर साताऱ्याजवळच्या आणेवाडी टोलनाक्यावर वसुलीला सुरुवात झाली आहे. पहाटेच्या सुमारास खासदार उदनयराजे भोसले टोलनाका सोडून निघून गेले. त्यानंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्तात वाढ केली आहे. तसंच उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या समर्थकांची धरपकडही सुरु केली आहे. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.