सातारा : माणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून श्रमदान
Continues below advertisement
दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज मातीत उतरले. साताऱ्यातील माणमध्ये आज पवारांनी ग्रामस्थांसोबत श्रमदान केलं. माणमधील ग्रामस्थ गेल्या कित्येक वर्षांपासून दुष्काळाला तोंड देत आहेत. यावर्षी वॉटर कपच्या पर्वातदेखील माण तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेते आणि सामाजिक संघटना श्रमदानासाठी गावकऱ्यांना हातभार लावत आहेत.
Continues below advertisement