Ramraje on Udayanraje | छत्रपती असल्यासारखं वागा, रामराजे निंबाळकरांचा उदयनराजेंवर निशाणा| ABP Majha

Continues below advertisement
उदयनराजेंवर 302 चे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी जरा छत्रपतींसारखं वागावं, असं म्हणत रामराजे नाईक निंबाळकरांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. बारामतीच्या पाणीप्रश्नावरुन राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना घरचा आहेर देणाऱ्या उदयनराजेंवर रामराजे निंबाळकरांनी टीका केली आहे. सगळी संस्थानं खालसा झाली. संस्थानं खालसा झाल्यावर कुणी छत्रपती लावत का? आताचे छत्रपती हे स्वयंघोषित आहेत. लोकं महाराज म्हणतात म्हणून आम्ही महाराज म्हणतो. ते छत्रपतींचे वंशज आहेत हे मान्य आहे, मात्र छत्रपती असल्यासारखं वागा. कमीत कमी सूर्याजी पिसाळासारखं वागू नका, एका बाजूला एक बोलायचं दुसऱ्या बाजूला एक बोलायचं, अशा शब्दात रामराजे निंबाळकरांनी उदयनराजेंवर टीका केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram