BIG BOSS MARATHI 2 | अभिजीत बिचुकलेला सेटवरुन अटक | ABP Majha
'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी अभिजीत बिचुकलेला सेटवरुन त्याला अटक केली. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजेच अटकेच्या वेळी बिचुकलेने कोणताही विरोध केला नाही.