सातारा : पोलिस मुख्यालयाबाहेरील शांतिदूताचा पुतळा हटवणार
Continues below advertisement
सातारा पोलिस मुख्यालयाबाहेर असलेला शांतीचा संदेश देणारा कबुतराचा पुतळा हटवण्यास सुरुवात झाली आहे. अतिशय गुप्तपणे पोलिसांनी पुतळा हटवण्याची मोहीम राबवली. आता हा पुतळा दुसऱ्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. पोलिस अचानक पुतळा का हटवत आहेत, यावरुन साताऱ्यात चर्चांना उधाण आलं आहे. 2002 मध्ये साताऱ्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त सुरेश खोपडे यांनी हा पुतळा बनवून घेतला होता.
Continues below advertisement