VIDEO | साताऱ्याची प्रियंका मोहिते 'मकालू'वर पाय रोवणारी पहिली भारतीय महिला | एबीपी माझा
साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहितेने मकालू शिखर सर करुन आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मकालू शिखर सर करणारी प्रियंका ही पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. मकालूची उंची आठ हजार मीटर्सपेक्षा अधिक असून, ते जगातलं पाचव्या क्रमांकाचं उंच शिखर आहे.