Koyna Dam | कोयना धरण ओव्हरफ्लो, धरणाचे दोन दरवाजे उघडले | सातारा | ABP Majha
Continues below advertisement
साताऱ्याचे कोयना धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणाच्या दरवाज्यावरूनही पाणी वाहताना पाहायला मिळतंय. वाऱ्याचा वेग वाढला की हे पाणी अलगदपणे दरवाज्यावरून वाहतंय. हा नजारा दुर्मिळ असल्याचे स्थानिक सांगतायत. कोयना धरणात सध्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी आहे. त्यात आजही कोयना परिसरात पाऊसाची संतधार सुरु आहे. त्यामुळे कोयना धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणाचे दोन दरवाजे नऊ इंचाने उघडलेत. यातून साडेचार हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येतोय.
Continues below advertisement