सातारा : खंडाळा बोगद्याजवळ टेम्पोचा भीषण अपघात, 18 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
साताऱ्याहून पुण्याकडे निघालेल्या आयशर टेम्पोला भीषण अपघात झाला. ज्यात 18 मजुरांचा मृत्यू झालाय तर 15 जण गंभीर जखमी आहेत. हे सगळे मजूर कर्नाटकातील रहिवाशी असल्याचं समजतं. वेळे फाटा ओलांडून पुढे आल्यानंतरच्या बोगद्याजवळ अतिशय धोकादायक वळण आहे, या वळणावर वेगात असलेल्या टेम्पोचालकाचा ताबा सुटला. त्यानंतर हा टेम्पो सुरक्षा कठडा तोडून रस्त्यालगत उलटला. पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडलीय. नागमोडी वळण आणि रस्त्याचा अतिशय घातक स्लोप यामुळे याआधीही इथं अपघाताच्या बऱ्याच घटना घडल्यात. मात्र त्याकडे राष्ट्रीय रस्तेबांधणी विभागानं लक्ष दिलेलं नाही. दरम्यान अद्यापही मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटलेली नाही.
Continues below advertisement