महाबळेश्वर : वेण्णालेकजवळचा रस्ता बंद, पावसाचा जोर वाढला
Continues below advertisement
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातही मुसळधार पाऊस सुरु आहे. महाबळेश्वर आणि पाचगणीकडे जाणाऱ्या पसरणी घाटात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळं खबरदारहीचा उपाय म्हणून पाचगणी-महाबळेश्वर रस्ता बंद करण्यात आला आहे. पाचगणीच्या वेण्णालेक जवळचा रस्ताही पाण्यात गेला आहे. तिकडे प्रतापगडाकडे जाणाऱ्या मार्गावरही जोरदार पावसामुळं वाहतूक संथ गतीनं चालू आहे. काल संध्याकाळपासूनच सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.
Continues below advertisement