ब्रेकफास्ट न्यूज : सातारा : अक्षय कुमारच्या 'केसरी' सिनेमाच्या सेटला आग

Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक येथे अक्षय कुमारच्या आगामी केसरी चित्रपटाच्या सेटवर आग लागण्याची घटना घडली. या आगीत फायबरचा बनवलेला संपूर्ण सेट आणि कॅमेरे जळून खाक झाले आहेत. येथे तयार करण्यात आलेल्या फायबरच्या डोंगरावर प्रचंड दारु गोळा साठवण्यात आला होता. त्याचाच स्फोट झाल्याने ही घटना घडलीय. ही आग इतकी मोठी होती की, त्याचा आवाज आजूबाजूच्या गावात देखील ऐकू आला. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून येथे अफगाणी लोकांवरचा हल्ला हा सीन शुट करण्याचे काम सुरु आहे. आगीत संपुर्ण सेटचं नुकसान झालं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram