सातारा : कोयना धरण क्षेत्रातील जंगलाला आग, मुऱ्हा गावातील घरांना झळ

Continues below advertisement
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणक्षेत्रात असलेल्या जंगलाला काल भीषण आग लागली. या आगीचे लोट जंगलालगत असलेल्या गावात पोहचले. आगीत शेकडो लहान मोठी झाडं जळून खाक झाली. जंगलातल्या पक्षी आणि जनावरांनाही याची मोठ्या प्रमाणात झळ बसली. जंगलाशेजारील मुऱ्हा गावातील चार घरंही या आगीत जळून भस्मसात झाली. आग विझवण्याच्या प्रयत्नात ग्रामस्थांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram