सातारा : पाऊस नसतानाही कास पठाराकडे जाणारा रस्ता का खचला?

Continues below advertisement
साताऱ्याहून जगप्रसिद्ध कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटाचा रस्ता खचला आहे. यामुळे घाटातली वाहतूक बंद केली गेलीय. ज्यावेळी हा रस्ता खचला त्यावेळीरात्र होती. सुदैवानं रस्त्यावर कुठलंही वाहन नव्हतं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रस्ता खचल्यानं  कासकडे जाणाऱे अनेक पर्यटक घाटातच अडकून पडले आहेत. कासमध्ये या काळात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची फुलं उमलतात.. त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.. मात्र त्याच काळात घाटाचा रस्ता खचल्यानं पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. महत्वाचं म्हणजे पाऊस नसतानाही रस्ता नेमका कशामुळे खचला.,याचं नेमकं कारण अजून कळू शकलेलं नाहीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram