Big Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेंचा बिग बॉसच्या घरात परतण्याचा मार्ग मोकळा | ABP Majha
अभिजीत बिचुकलेला खंडणीच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. फिर्यादीनेच स्वत:हून तक्रार मागे घेतल्याने अभिजीत बिचुकलेचा बिग बॉसमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बिचुकलेला अटक झाल्यापासून बिग बॉसची टीम साताऱ्यात ठाण मांडून होती. आता तक्रार मागे घेतल्याने टीम बिचुकलेला घेऊन पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे. बिचुकलेवर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीने स्वत:हून न्यायालयात "माझी अभिजीत बिचुकलेविरोधात कोणतीही तक्रार नाही" असं लिहून दिल्यामुळे आता बिचुकलेला मोठा दिलासा मिळाला आहे. अभिजीत बिचुकलेमुळे साताऱ्याचं नाव उंचावले जात होते आणि अभिजीत बिग बॉसचे पारितोषिक मिळेल असाच खेळत असल्यामुळे त्याला बक्षीस मिळणार अशी आशा असल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे. बिचुकलेच्या विरोधातील तक्रार स्वत:हून मागे घेतल्याचं तक्रारदार फिरोज पठाण यांनी न्यायालयात लिहून दिले.