सातारा : सलग दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर गारठलं, वेण्णा लेकचं तापमान 5 अंशांवर
Continues below advertisement
महाबळेश्वरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऱ्याची घसरण सुरु आहे. त्यामुळे इथं थेट काश्मीरचा अनुभव येत आहे. कालप्रमाणे आजही महाबळेश्वरचा पारा थेट 10 अंशांपर्यंत खाली घसरला आहे. तर प्रसिद्ध वेण्णालेक परिसरातलं तापमान तब्बल 5 अंशांपर्यंत खाली आलं आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी तर दवबिंदू गोठल्याची दृश्यंही दिसत आहेत. त्यामुळे काल परवापर्यंत उन्हामुळे हैराण असलेल्या महाबळेश्वरकरांना अचानक स्वेटर शोधण्याची वेळ आली आहे.
Continues below advertisement