नाशिक : सटाण्यामध्ये रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारांमुळे ट्रॅकमधील चारा पेटला

Continues below advertisement
तिकडं नाशिक जिल्ह्यातल्या सटाण्यामध्ये वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळं एका ट्रकनं पेट घेतला. इथल्या तळवाडे भामेरध्ये संध्याकाळी ५ वाजता जनावरांसाठी चारा घेऊन जाणाऱ्या ट्रकला, रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारांचा स्पर्श झाला आणि ट्रकमधल्या सगळ्या चाऱ्यानं पेट घेतला. ट्रक चालकानं दाखवलेल्या सतर्कतेमुळं मनुष्यहानी झाली नाही, मात्र जनावरांसाठी जाणाऱा हजारो रुपयांचा चारा जळून खाक झाला. त्यामुळं वीज वितरणचा हा कारभार कधी सुधारणार हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram