VIDEO | संजय निरुपम उत्तर पश्चिम मुंबईतून लढण्यावर ठाम | एबीपी माझा
राज्यातील लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची मुंबईत दोन दिवसीय बैठक झाली. आज या बैठकीत संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये निश्चित झालेल्या उमेदवारांची नावे अंतिम मंजुरीसाठी दिल्लीला पाठवली जाणार आहेत. या बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित होते. कोण उमेदवार जिंकून येऊ शकतो हा निकष लक्षात घेतला गेला. यात 26 मतदारसंघातील उमेदवारांवर चर्चा झाली.