मुंबई : 62 वर्षीय चाहतीकडून आयुष्याची सगळी कमाई संजय दत्तच्या नावावर
Continues below advertisement
क्रेझी फॅन्स आपल्या आवडत्या कलाकारासाठी काय करतील, याचा नेम नाही. अभिनेता संजय दत्तच्या चाहतीने तर आपली दौलतच संजूबाबावर उधळून टाकली. 62 वर्षीय निशी त्रिपाठी यांनी मृत्यूपूर्वी आपल्या सेफ डिपॉझिटमधील रक्कम संजय दत्तच्या नावे केली. संजय दत्तच्या मनाचा मोठेपणा म्हणजे त्याने यातील एका पैसाही घेण्यास नम्रपणे नकार दिला आहे. 'बँक ऑफ बडोदा'च्या मुंबईतील वाळकेश्वर शाखेला पत्र लिहून ही रक्कम त्रिपाठी कुटुंबाला हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे.
Continues below advertisement