VIDEO | सांगलीतील जिल्हा कारागृहात पुराचं पाणी शिरलं, 340 कैदी पाण्यात अडकले | एबीपी माझा
सांगली शहराप्रमाणेच जिल्हा कारागृहात पाणी शिरलंय. त्यामुळे जवळपास 340 कैदी कारागृहात अडकले आहेत. कैद्यांना बाहेर काढण्यासाठी जेल प्रशासनानं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे मागणी केली आहे. तर, सांगलीचं जुनं जिल्हाधिकारी कार्यालयालाही कृष्णेच्या पुरानं वेढा घातला आहे. जुनं जिल्हाधिकारी कार्यालय असलं तरी अजूनही तिथे काही विभागांचं कामकाज चालतं.